मंदार केणी यांनी सुर्यावर थूंकण्याचा प्रयत्न करू नये
केनी धूमकेतू प्रमाणे कधी तरी उगवतात:- महेंद्र चव्हाण
प्रतिनिधी सुनील आचरेकर
सिंधुदुर्ग
दत्ता सामंत हे राजकारण कमी समाजकारण जास्त करीत असतात म्हूणन ते जनतेला आपलेसे वाटतात. त्याच भावानेतून महामारीत मदत कार्य करीत आहेत. परंतु आमदार वैभव नाईक चमकेगिरी जास्त आणि जनहिताची कामे कमी करतात. म्हणून सामंत यांनी आमदार नाईक यांना जबाबदारीची जाणीव करून दिली त्यात वावगे काही नाही. याचा बाऊ नगरसेवक मंदार केणी यांनी करू नये. केणी हे धूमकेतू प्रमाणे कधीतरी उगवतात त्यांची टीका ही सेनेत स्वतःचे नसलेले असत्विव निर्माण करण्याच धडपड आहे टीका जी. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी केणी यांच्यावर केली.
नगरसेवक केणी यांनी भाजप नेते दत्ता सामंत यांच्यावर टीका केली होती त्याला बांधकाम सभापती चव्हाण यांनी उत्तर दिले. केणी यांना शिवसेनेत कोणीच विचारत नाही हे जनतेला माहित आहे. म्हणून ते सामंत यांच्यावर टीका करून सूर्यावर थुकाण्यासारखा प्रकार करु पाहत आहेत. केणी यांची टीका म्हणजे बालिश बहू बायकात बडबडला अशीच आहे. केणी असे प्रकार करून आमदार नाईक यांचे समर्थक होऊ पाहत आहे जेणेकरून पदरात काहीतरी पडेल अशी त्यांची अपेक्षा असेल. सेनेत स्वतःची नसलेली पत आणि जम बसाविण्यासाठी आदळआपट करीत आहेत.
सामंत हे राणे परिवाराचे जवळचे आहेत. राणे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही हे त्यांनी अनेकवेळा जाहीर बोलून दाखविले आहे. सामंत पदाच्या अपेक्षेने काम करीत नाहीत. जनसेवा हा त्यांचा स्वभाव आहे त्याच भावनेतून अविरत काम करीत आहेत. पुढील विधानसभा निवडणूक आमदार नाईक यांना सोपी नाही हे सर्वश्रुत आहे. यांची जाणीव नाईक आणि सेनेला आहे. म्हणूनच सामंत यांची धास्ती सेना आणि नाईक यांनी घेतली आहे. आमदार नाईक यांना जबाबदारीची जाणीव सामंत यांनी किंवा सर्वसामान्य जनते करून दिल तर त्यात वावगे काय. मतदार संघांचे वैभव गमावून बसलेल्या आमदार नाईक यांना जाब विचारत राहू आणि याची लाज केणी यांना वाटत असेल तर त्यांनी आमदार यांना जनहिताची कामे करण्याचा सल्ला द्यावा सामंत यांच्या वर टिका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल