म्हापण गावातील जनता कर्फ्यु आज मध्यरात्रीपासून समाप्त; मात्र……
उद्यापासून शासकिय लॉकडाऊनचे पालन करणे बंधनकारक..
उद्यापासून सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील…
जनता कर्फ्युमध्ये प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ व व्यापारी वर्गाचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले…
प्रतिनिधी:-समीर चव्हाण
जिल्ह्यातील कोरोणा रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने दिनांक ७ मे २०२१ ते १५ मे २०२१ या कालावधीत वेंगुर्ला तालुक्यात जनता कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा(मेडिकल, शेती) वगळता इतर सर्व सेवा म्हणजे भाजीपाला, किराणा, पोल्ट्री, मासे विक्री, या सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या जनता कर्फ्यु ला म्हापण गावातील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी उत्स्पूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यु चे काटेकोर पालन केले. व्यापारी व जनतेच्या या सहकर्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान उद्यापासून राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१ मे पर्यंतच्या लॉकडाऊन निर्बंधांचे पालन करणे जनतेला बंधनकारक राहील.
उद्यापासून सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. किराणा दुकान, दुध, भाजीपाला, पोल्ट्री, अंडी, मासे विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहील मात्र या सेवांचा लाभ घेताना सोशल डिसटन्स, मास्क घालने, गर्दी न करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
जनता कर्फ्यु संपला तरी कोरोणा संपलेला नाही त्यामूळे जनतेने वेळेचं गांभीर्य ओळखून गर्दी न करता शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करत दीलेल्या वेळेत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांचा लाभ घ्यावा. कामाशिवाय अवांतर फिरणे टाळावे, दररोज बाजारात खरेदिसाठी येण्यापेक्षा आठवडाभराचा लागणारा बाजार एकदाच खरेदी करावा व वारंवार बाजारात येणे टाळावे. म्हापणमध्ये कोरोणा रुग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांनी शक्यतो बाहेर फिरणे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन म्हापण सरपंच अभय ठाकुर यांनी केले.

