कणकवली उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या कोविड योद्धा सिस्टरांचा पुष्प देऊन सत्कार…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १२ आज परिचारीका दिन, या परिचारीका माय – भगिनी अहोरात्र आपल्या कामात समरस असतात, यांच्या कामाची दखल फारशी घेतली जात नाही. मात्र त्यांच्याकडुन कसलीही तक्रार नसते, आपल्या कामाशी त्या प्रामाणिक राहुन रुग्णांच्या सेवेत स्वतःला एकरूप करतात.
आज कोविड काळात देखील स्वतःच्या जीवाची काळजी न करता रुग्णांच्या सुश्रुषा करून धन्यता मानणाऱ्या, स्वतःला समाधानी समजणाऱ्या या परिचारीका म्हणजे एकाप्रकारे समाजसेवेचा वसा घेतल्या सारखाच आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज जागतिक परिचारीका दिनानिमित्त या माय – भगिनींचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुका सचिव संतोष कुडाळकर, कणकवली शहराध्यक्ष प्रशांत उपरकर आदी उपस्थित होते.

