आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾हेदुस-वाघमळा येथील अभिजित सखाराम देसाई यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा दि-१२ :- हेदुस-वाघमळा ता. दोडामार्ग येथील व सध्या पुणे येथे कुटुंबासोबत स्थायिक असलेला युवक अभिजित सखाराम देसाई (वय ३३) याचे पुणे येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

अभिजीतचा अडीच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. खासगी कंपनीत तो उच्च पदावर नोकरीला होता. त्याच्यावर गेले पंधरा दिवस पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता त्याची प्राणज्योत मालविली. त्याच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सखाराम देसाई यांचा तो मुलगा होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!