आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◼️जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आरोग्य यंत्रणेला पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट..

 

◾उद्योजक आनंद पेडणेकर यांनी निभावले सामाजिक दायित्व..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०९ :- संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स पेढीने चिपळूण तालुका आरोग्य विभागाला पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट स्वरूपात दिले आहेत.

जगन्नाथ गगंगाराम पेडणेकर ज्वेलर्स चे मुख्य संचालक तथा प्रतिष्ठित उद्योगपती आनंद जगन्नाथ पेडणेकर यांचे आपद्ग्रस्त काळात शासनाला सदैव मदतकार्य सुरू असते कोरोना महाभयंकर संकट काळात सध्या कोरोना रुग्णांना प्राणवायू ची नितांत आवश्यकता आहे ,ही बाब लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता आनंद पेडणेकर यांनी चिपळूण तालुका आरोग्य विभागास पाच ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क मोफत भेट दिले आहेत,

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स चिपळूण पेढीचे व्यवस्थापक प्रशांत शिरवडेकर ,बीपीन चव्हाण,विनती सावंत यांनी सदर ऑक्सिजन सिलेंडर चिपळूण तालुका आरोग्य विभागात तालुका वैद्यकीय अधिकारी जोती यादव यांच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!