राजकीयशासकीयसामाजिक

नोकरीनिमित्त गोव्यात ये-जा करणाऱ्या लोकांना दिलासा;सध्यातरी ई-पास ची गरज नाही

 

लवकरच ह्याबाबत सोयीस्कर मार्ग काढू-तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

सावंतवाडी,दि.२५:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना सिंधुदुर्गात विनापास प्रवेश दिला जाणार नाही असे प्रशासनाने जाहीर केले आहे मात्र दररोज गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे लक्षात घेता याबाबत सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत आमदार दिपक केसरकर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्नी.दाभाडे यांच्याशी याबाबत चर्चा केली तर कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्या मुलांना पास लगेच आता पास काढणे कठीण होईल म्हणूनच फक्त नोकरीनिमित्त गोव्यात जाणाऱ्या मुलांना आज रविवार,सोमवार आणि मंगळवार ह्या ३ दिवशी ई-पास साठी मुभा देण्यात आली आहे याबाबत स्थानिक प्रशासन,ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून लवकरच नोकरीसाठी जाणाऱ्या मुलांना सोयीस्कर होईल असा मार्ग काढून हा प्रश्न सोडवला जाईल जेणेकरून कामाला जाणाऱ्या लोकांच्या रोजगाराला कोणताही धक्का बसणार नाही ह्याची काळजी आम्ही शिवसेना पक्ष घेऊ अशी माहीती तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!