सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी
ऑक्सिजन कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली जात आहेष- जिल्हाधिकारी -के मंजूलक्ष्मी
सावंतवाडी दि.२५ एप्रिल (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्याला अडीज मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. ऑक्सिजन कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे, असे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
सावंतवाडी – आंबोली मार्गावरील बुर्डी पूल नजीक कारीवडे येथील हॉटेल अनंत पॅलेस मध्ये श्री साई समर्पित कोविड आरोग्य केंद्र डॉ. अजय स्वार व डॉ. मिलिंद खानोलकर यांनी सुरू केले त्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,नायब तहसीलदार विजय पवार,डॉ. अजय स्वार, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. अमृता स्वार, डॉ. अनीश स्वार, डॉ. उमेश मसूरकर, डॉ. संदीप सावंत आदी उपस्थित होते
यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा भासत नाही तरीही सध्या रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजन तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात एक प्लांट आहे तसेच कोल्हापूर येथून देखील ऑक्सिजन आणत आहोत शंभर रुग्ण ऑक्सिजन वर आहेत .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीज मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे असे त्या म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आणि खाजगी कोविड सेंटर जिल्ह्यात सुरू असून त्या ठिकाणी उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील जनतेने कोविड लक्षणे आणि ऑक्सिजन कमी झाला असे वाटल्यास तात्काळ ऍडमिट व्हावे. घरगुती उपचार करत बसण्यापेक्षा ऍडमिट झाल्यानंतर ते रिकव्हरी होऊ शकतात शेवटच्या क्षणाला रूग्णालयात आल्यानंतर ते रिकव्हरी होताना अडचणी येतात.
जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी म्हणाल्या,जिल्ह्यात गृहअलगीकरणात असणाऱ्यां रुग्णावर उपचार केले जात आहेत जिल्ह्यात दोन आरटीसीपीआर मशीन होत्या त्यापैकी एक तांत्रिक नादुरुस्त झाली होती ती आता दुरुस्ती करून सुरळीत सुरू झाली आहे
डॉ.अजय स्वार म्हणाले,या कोविड आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा आणि साध्या बेड उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ऑक्सिजनचे १८ सिलेंडर आहेत तसेच ऑक्सीजन मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही.या समर्पित कोविंड आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवा आणि रुग्णांची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी तयारी ठेवण्यात आली आहे डॉक्टर आणि स्टाफ सतत कार्यरत राहणार आहे.