मुळातच रँपिड टेस्ट च्या कीटचा तुटवडा असल्याने गरज असेल तरच रँपिड टेस्ट करा-गुरुदास गवंडे
्
टेस्ट झाल्यावर अहवाल ४ ते ५ दिवसांनी येत आहेत;त्यामुळे धोका वाढत आहे
सावंतवाडी,दि.२२:-तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोना चे रुग्ण आढळत आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहे त्या ठिकाणच्या नातेवाईकांना rt-pcr टेस्ट करण्यासाठी शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी या ठिकाणी घेऊन जातात परंतु सोमवारी टेस्ट केलेल्यांचे अहवाल अद्यापर्यंत मिळालेले नाहीत जर रिपोर्ट येण्यास चार चार दिवस लागत असतील तर ते खूप धोकादायक आहे.
त्यामुळे ते लवकरात लवकर मिळावे तसेच अनेक शहरांमध्ये विनाकारण फिरणारा यांची रॅपिड टेस्ट केली जाते परंतु रॅपिड टेस्ट साहित्य आपल्याकडे जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहे त्यामुळे उगाच कुठेतरी टेस्ट करून रॅपिड चे किट खर्च करू नका ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे त्याच ठिकाणी रॅपिड टेस्ट करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे असे निवेदन गुरुदास वासुदेव गवंडे तालुकाअध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे दिले आहे.