प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी इन्सुलीत केलेल्या तिन डंपर कारवाईला मनसेकडून गुरुदास गवंडे यांच्या शुभेच्छा..
▪️इन्सुली,सोनुर्ली,व्येत्ये येथील अवैध काळ्या दगडांच्या खाणींवर प्रांताधिकाऱ्यांनी कडक पावले उचलावीत; गवंडे यांची मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१३: उपविभागीय महसूल अधिकारी सुशांत खांडेकर यांनी काल इन्सुली या ठिकाणी अनधिकृत वाळू व खडी वाहतुकीवर केलेली कारवाई योग्य असून त्यांच्या या कार्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रांताधिकारी श्री. खांडेकर यांनी इन्सुली येथे केलेल्या तीन डंपरवर कारवाई प्रमाणे अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात डंपर व्यावसायिकांकडून पासवर खाडाखोड करून अनाधिकृत खडी व वाळू वाहतूक केली जात असेल तर ती महसूल यंत्रणेला घातक आहे. याबाबत वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदने दिलेली आहेत. परंतु काल जी कारवाई प्रांताधिकारी श्री. खांडेकर यांनी केलेली आहे, ती योग्य असून यापुढे त्यांनी अशीच कारवाई करत राहावी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात जाणारी अवैध वाळू आणि खडी यांच्यावर नजर ठेवून कडक कारवाई करावी, जर प्रांत अधिकारी अशी कारवाई करत असतील तर ते योग्यच असल्याचे सांगून श्री. गवंडे यांनी प्रांत अधिकारी यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान इन्सुली, सोनुर्ली व व्येत्ये आदी ठिकाणी असणाऱ्या अवैध काळ्या दगडांच्या खाणीवर प्रांताधिकारी श्री. खांडेकर यांनी कारवाई करावी, शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात सुरुंग ब्लास्टिंग तसेच अनधिकृत खडी उत्खनन केले जाते. त्याच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अशी मागणी असल्याचे श्री. गुरुदास गवंडे म्हणाले.
आज सर्वसामान्य नागरिक आहेत, ज्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून घरे मंजूर झाली आहेत. मात्र, त्यांना वाळू व खडी मिळत नाही. पण अशी सर्रास वाळू आणि खडी गोवा राज्याला मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गातून पुरवली जाते. यामुळे शासनाचा महसूल बुडविला जात असल्याचा गौप्यस्फोट. श्री. गुरुदास गवंडे यांनी केला आहे.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_