कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भ्रष्टाचार झाला नाही तर तुम्हांला का झोंबलय??

रुपेश राऊळ यांचा संजू परब यांना सवाल

सावंतवाडी, दि.१७:- नगरपालिकेच्या शिवसेनेच्या गटनेत्या लोबो मँडम यांनी वाॅटर एटीएम मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला होता.वाँटर एटीएम मध्ये भ्रष्टाचार झाला नाही तर मग सावंतवाडी च्या नगराध्यांना का झोंबले? असा सवाल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज पत्रकार परिषद घेत उपस्थित केला आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री निधी देत नसल्याचे वारंवार आरोप करत असलेले संजू परब यांनी काल पालकमंत्री निधी देतात हे स्वतःअप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. त्या वाॅटर एटीएम बाबत असाच भ्रष्टाचाराचा प्रकार वेंगुर्ले येथेही घडला आहे याबाबत नक्कीच पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून चौकशी लावण्याची मागणी करणार असल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नगरसेविका अनोरोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे ,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नगरसेवक तथा शहरप्रमुख बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!