कोकणसिंधुदुर्ग

डेरवण युथ गेम नेमबाजी स्पर्धेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचा साईश तळणकर सुवर्ण पदकाचा मानकरी

 

 

*🎴 सावंतवाडी:२६ मार्च*

राज्यस्तरीय युथ नेमबाजी स्पर्धा या डेरवण येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव चा विद्यार्थी साईश दिंगबर तळणकर याने 17 वर्षाखालील स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकाशत 400 पैकी 377 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.यापूर्वी 2021 मध्ये सुद्धा साईश याने याच क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.

साईश याला प्रशिक्षक कांचन उपरकर व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले व आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले असून येत्या 25 मार्च 2022 पासून भोपाळ येथे सुरु होणाऱ्या व 15 एप्रिल 2022 पासून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड पूर्व चाचणीसाठी साईशची निवड झाली आहे. साईश याच्या या यशाबद्दल संस्था सचिव आर.आर.राऊळ, अध्यक्ष मळगावंकर ,खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापिका सौ.श्रध्दा सावंत, पर्यवेक्षक फाले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी साईशचे अभिनंदन केले असून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!