आणखीआरोग्यकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

आज कणकवली शहरात मेडिकल, दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १७ शहरात मेडिकल, दवाखाने वगळता सर्व अत्यावश्यक दुकाने बंद ठेवली आहेत. पटवर्धन चौकात पोलिस आणि आरोग्य पथक तैनात केले आहे. विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई पोलिस करत आहेत.

आरोग्य पथकांकडुन नागरिकांची अँटीजेन, रॅपिड टेस्ट केली जात आहे. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत २७ जणांची टेस्ट केली आहे. या टेस्टमध्ये सकाळपासुन कणकवली शहरात २ कोरोना रुग्ण पाॅझिटीव आढळून आल्याचे आरोग्य पथकाकडून सांगण्यात आले आहे. हे रुग्ण कलमठ आणि जाणवली येथील आहेत.

तरी विनाकारण कोणी बाहेर फिरू नये, तसे आढळल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!