सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही; चौडू पाटील

दसरोत्सवात अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव

🎴आंबोली,दि.०४: अनेक वेळा चौकुळ सातेरी मंदिर मध्ये बैठक घेऊन आंबोली येथील चौंडू धोंडू पाटील यांच्या वादावर तोडगा काढू असे आश्वासन देऊनही तहसीलदार उपस्थित न राहिल्याने तीन वेळा गावातील प्रमुख मंडळींना मीटिंग आयोजित करून परतून जावे लागले. आता दसरा सणा निमित्त आमच्या सामायिक घरात मुख्य कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी आपण गेल्यावर कोणताही वाद, विवाद निर्माण झाल्यास अनुचित प्रकार घडल्यास , त्याची सर्वस्वी जबाबदारी सावंतवाडी तहसीलदार यांच्यावर राहील अशा आशयाचे निवेदन तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते  चौंडू धोंडू पाटील यांनी  सावंतवाडी तहसीलदार यांना दिले आहे.

मौजे आंबोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील सर्वे नंबर ८४-१ या व तर अन्य बर्‍याच ठिकाणी आपली वडिलोपार्जित  जमिनी आहेत सदर जमिनीची आमच्या आईने तोंडी वाटणे करून दिली होती. असे असताना आपला भाऊ श्री गणपत धोंडू पाटील व त्याचे कुटुंबीय हे आईच्या पश्चात सदर जमिनीतील माझ्या वहिवाटीच्यि क्षेत्रात मला वापर करण्यास हरकत करीत आहे. तसेच गणपत पाटील याने त्याच्या घराचे सांडपाणी माझ्या घरासमोर सोडले आहे, त्याविषयी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर खड्डा मारून चुकीच्या ठिकाणी सदर पाणी मुरविण्यात आले त्यामुळे झालेल्या अडथळ्यामुळे पावसाचे पाणी माझ्या घराच्या पायऱ्या जवळ येत आहे.

गणपत पाटील हा माझ्या वाटणीच्या क्षेत्रात घुसून तंटा निर्माण करीत असतो या संदर्भात २६ नोव्हेंबर २०१८ व १७ फेब्रुवारी २०२० रोजी तहसीलदार यांच्याकडे या विषयी लेखी तक्रार केलेल्या आहेत तसेच १२ डिसेंबर२०१९ व दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी तलाठी आंबोली यांच्याकडे या विषयाची लेखी तक्रार केलेली आहे, तसेच याविषयी शेकडो वेळा मी तक्रारी केल्यात परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नसल्यामुळे मी १५ जानेवारी २०२० रोजी सावंतवाडी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले. त्या नंतर सोबत मंडळ अधिकारी तलाठी पोलिस पाटील सरपंच गटविकास अधिकारी यांच्यासमवेत सदर ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करून तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करून न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सातेरी मंदिर चौकुळ येथे बैठक लावून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोन वेळा चौकूळ येथे बैठक लावून सावंतवाडी तहसीलदार हजर राहिले नाहीत व वादावर तोडगा काढला नाही.

सावंतवाडी तहसीलदार यांनी तोडगा न काढल्याने दसरा निमित्त आमचे सामायिक घरात मूळ देवस्थान असल्याने तेथे मला उपस्थित राहावे लागणार आहे.त्यावेळी त्या ठिकाणी भांडण-तंटा व अनुचित प्रकार घडल्यास त्याला महसूल प्रशासन जबाबदार राहणार आहे असे निवेदन तक्रार धोंडू पाटील यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना दिले आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!