आणखीआपत्कालीनकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

रस्त्यावर आडवा आलेला वृक्ष देतोय अपघाताला आमंत्रण

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १५ आचऱ्याला जाताना श्री. क्षेत्र हनुमान मंदिर वरवडे याच्या जरा पुढे गेल्यावर एक वृक्ष रस्त्यावर आडवा आलेला दिसुन येतो. खुप महिने झाले, याकडे कुणाचे लक्ष्य नसल्याचे दिसून येते. येथुन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची तक्रार आहे आणि स्थानिक नागरिक यांची देखील.

हा वृक्ष जर पावसाच्या पाण्यामुळे माती उंबळून रस्त्यावर कोसळला आणि तेथूनच कोनीतर जात असेल. त्याच्या अंगावर किंवा एखाद्याच्या गाडीवर कोसळला, तर खुप मोठा अपघात होण्याची शक्यता येथील नागरिकांकडून दर्शवली गेली आहे.

तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष्य देत, तो वृक्ष लवकरात लवकर तोडावा. अस येथील नागरिकांचं म्हणणं आहेत. प्रशासन म्हणा, तेथील सरपंच, ग्रामपंचायत, पोलिस पाटील यांनी इकडे थोड लक्ष्य देत. तो वृक्ष तोडावा आणि पुढे येणाऱ्या आपत्तीला आताच आळा घालावा. असे येथील नागरिकांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!