रत्नागिरीत विनाकारण फिरताय;विनाकारण फिरणाऱ्यांची केली जाते अँटीजेन टेस्ट
रत्नागिरीत विनाकारण फिरणाऱ्यांची केली अँटीजेन टेस्ट; यामध्ये तिघे सापडले कोरोनाबाधित..
*प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*
*🎴रत्नागिरी, दि.१५:-* कोरोना साखळी तोडण्याकरिता सरकारने राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही रत्नागिरीत आज विनाकारण फिरणाऱ्या १०२ जणांची पोलिसांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अँटीजेन टेस्ट घेतली. त्यामध्ये ३ जण कोरोना बाधित आढळले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.विनाकारण फिरणाऱ्यांना एवढे सांगून विनंती करुन समजत नसेल तर अँटीजेन टेस्ट करायचा मार्ग आज अवलंबण्यात आला. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करीत असून जीवित सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घरीच थांबावे. विनाकारण बाहेर फिरू नये असे पोलिस वारंवार आवाहन करत आहेत.
राज्यात कोरोना स्थिती गंभीर वळणावर असून ही साखळी तोडण्यासाठी आघाडी सरकारने राज्यात १ मे पर्यंत ब्रेक दि चेन मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध घातले आहेत. लोकांचे जीवित सुरक्षित ठेवणे याला सरकारने प्रथम प्राधान्य दिले असून त्यासाठीच हे निर्बंध राज्यात लागू करण्यात आले आहेत.

