सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचा एक कर्मचारी कोरोनाबाधित
प्रतिनिधी:-संजय शेळके
वैभववाडी,दि.१५:- येथील सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वैभववाडी शाखेतील कर्मचाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर संबंधित संस्थेच्या कार्यालयात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.यासाठी सावंतवाडीतील संजू विरनोडकर मित्रमंडळाने पुढाकार घेतला.यावेळी अतिदक्षतेखालील संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.
संबंधित पतसंस्थेत कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुनील राऊळ यांनी दिली.त्यानुसार संजू वीरनोडकर टीमचे सहकारी त्याठिकाणी दाखल झाले.व पतसंस्थेचे कार्यालय तसेच इमारत लगतचा परिसर कोरोनाप्रतिबंधक फवारणी करून निरजंतुक केला.

