रत्नागिरीसामाजिक

जिओ रिलायन्स विरोधात तीव्र आंदोलन छेडणार; बांधकाम सभापती अरुण कदम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴रत्नागिरी,दि.०४: जिओ रिलायन्स कंपनी कुणाच्यातरी सांगण्यावरून जर काम थांबवत असेल व सर्वसामान्य ग्राहकांना फसविण्याचा प्रयत्न करीत असेल तर शिवसेना हे सहन करणार नाही. विनाविलंब काम सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू असे माजी बांधकाम सभापती अण्णा उर्फ अरुण कदम यांनी रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीत सांगितले.

आम्हाला धमक्या येतात, जीवे मारण्यापार्यंत धमक्या येतात. आमचे काम अनेक दिवस चालणार आहे. अशा वेळी आमच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका झाल्यास आम्ही कुणाकडे दाद मागणार असे अधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीत आमदार योगेश दादा कदम यांच्याकडे काम रखडल्याचे कारण सांगताना वरील व्यथा मांडली. यावर बोलताना आमदार योगेशदादा कदम म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात गुंडाराज नाही. या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम व सक्षम आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीचे निवारण करा, त्यांच्या समस्या सोडवा, त्यांच्या जवळ चर्चा करा दापोली मतदारसंघातील सुजाण नागरिक आपल्याला निश्चितच सहकार्य करतील. वेळप्रसंगी जनतेला चांगली सेवा मिळावी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे नुकसान होऊ नये तसेच व्यापाऱ्यांनाही व्यवसायात मदत होणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आपल्याला संपूर्ण मदत करतील, तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करतील, परंतु काम त्वरित सुरू करा लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला चांगल्या प्रकारची सेवा द्या. याउपरही कामे करण्यास कचुराई केल्यास शिवसेना स्वस्त बसणार नाही. याची नोंद घ्यावी असे यावेळी आमदार योगेशदादा कदम यांनी सांगितले.

उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर या आंदोलनाचे नेतृत्व करतील. प्रशासनाने व पोलिस यंत्रणेने याची दखल घेऊन दापोली मतदारसंघात काम करणाऱ्या जिओच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना संपूर्ण सहकार्य करावे. यापुढे जनतेच्या भावनांशी कोणाला खेळू देणार नाही. जिओ व बीएसएनएल बाबत जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यांच्या संयमाचा अंत पाहून नका. उद्रेक झाल्यास विनासेवा उभे असलेले टॉवर काढून टाकले जातील असा इशारा अण्णा कदम यांनी दिला .

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!