रत्नागिरीराजकीय

रत्नागिरीत कॉंग्रेस आक्रमक, टायर जाळुन व्यक्त केला निषेध..

कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी सह्यांचे निवेदन..

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴रत्नागिरी,दि.०४: केंद्र सरकारने कृषी विधेयक काढून देशातील शेतक-यांवर अन्याय केला आहे. हे विधेयक तात्काळ रद्द करावे यासाठी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी जिल्हाधिकारी कायालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्या पिडीत मुलीच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी गेलेले खासदार राहूल गांधी यांना धक्काबुक्की करुन त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचा देखील जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. यावेळी देखील भाजपा सरकारच्या कारभारावर जोरदार टीका तसेच घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला पोलिस व कॉंग्रेस कार्यकर्ते थोडी झटापट देखील झाली. कॉंग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड.विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर तथा नवरसेवक अविनाश लाड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या श्रीमती रुपालीताई सावंत, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या श्रीमती अश्विनी आगाशे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, खेडचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, कपिल नागवेकर, दिपक राऊत, अल्पेश राऊत, लियाकत शहा आदि उपस्थित होते.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!