कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

योगेश पेढांबकर माहिती अधिकार महासंघ राज्य प्रचार प्रमुख पदी निवड

ब्यूरो न्युज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग

रत्नागिरी – स्वराज्य बहुद्देशीय संस्था RTI माहिती अधिकार अधिनियम कायदा २००५ नुसार भारतीय लोकशाही मध्ये प्रत्येक सामान्य नागरिकास माहितीचा अधिकार आहे. मुंबई महासंघाच्या कार्यालयात राज्य बैठकीत कार्यकर्ता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशीनुसार उल्लेखनीय दमदार लेखणीमुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्याचे पेढांबे गावचे श्री. योगेश तानु पेढांबकर यांची माहिती अधिकार राज्य प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ते माध्यमिक शिक्षक ते पत्रकार व आताच माहिती अधिकार अधिनियम २००५ चे मुंबई महासंघाचे माहिती अधिकार प्रचारप्रमुख पदी निवड झाली आहे. याबाबतीतील निवड पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.
एक जबाबदार नागरिक व दक्ष नागरिक म्हणून काम करण्यास केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ हा जनसामान्यांचा कायदा आहे. या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी लोकाभिमुख व भ्रष्टाचार मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हाच उद्देश आहे.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे सदस्य व दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरीचे प्रतिनिधी तसेच एक माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने श्री योगेश पडमकर यांचे राज्य कार्यकारणी मंडळामार्फत विशेष अभिनंदन करण्यात येत आहे तसेच या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यातुन विशेष अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!