कणकवली बस स्थानकात नगरपंचायत कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०९ बस स्थानकात कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला आहे. हि मृत व्यक्ती श्रावण गावातील असून कणकवली नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. त्याचे नाव उत्तम मुणगेकर (वय ४५) रा. श्रावण असे असून, गुरुवारी रात्रीपासून तो कणकवली बस्थानकात होता.
शुक्रवारी सकाळी बस्थानकात हा मृतदेह बसस्थानकातल्या कर्मचाऱ्यांना एस. टी. पास ऑफिसच्या बाजूच्या बाकावर दिसून आला. नेमका मृत्यू कसा झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत कर्मचारी व कणकवली पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पी. एस. आय. अनमोल गावराने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए.म चव्हाण यांनी धाव घेतली.
यावेळी त्यांचे भाऊ गौतम मुणगेकर हेही तेथे उपस्थित झाले होते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, वडील असा परिवार आहे.

