माजी उपसभापती कृष्णा सावंत यांना पत्नी शोक
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी – अक्षय उर्फ बबलू गांवकर
🎴ओटवणे : दि. १५ विलवडे टेंबवाडी येथील साै. मीरा कृष्णा सावंत ( ६५) यांचे सोमवारी सकाळी ६.३० वाजता हृदय विकारांच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाने सावंत कुटुंबियांसह सर्वानाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेऊन सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले.
दुपारी १२:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, दोन मुली, दोन दिर, भावजय, पुतणे, पुतणी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या त्या पत्नी, पं. स. सावंतवाडी चालक गुणाजी उर्फ रुपेश सावंत यांच्या आई, तर विलवडे हायस्कूलचे निवृत्त लिपिक सुरेश सावंत व मनोहर सावंत यांच्या त्या भावजय होत. तसेच विलवडे शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत यांच्या जाऊ होत.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

