◼️उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा ९ एप्रिल रोजी रत्नागिरी दौरा..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-०८ :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार ०९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९:४५ वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचे समवेत जिल्ह्यातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबत तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध संदर्भात आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी ११:३० वाजता पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचे समवेत सिंधुरत्न समृध्दी योजनेबाबत आढावा बैठक स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी. दुपारी १२ वाजता पालकमंत्री ॲड. अनिल परब यांचे समवेत रत्नागिरी जिल्ह्यातील रा.प. महामंडळाच्या बसस्थानकाच्या सद्यस्थिती आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी १२:३० वाजता पत्रकार परिषद (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी ०१ ते १:३० वाजता राखीव. दुपारी १:४५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने सिंधुदूर्गकडे प्रयाण.

