कर्णबधिर चित्रकार पुजा धुरी हीचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र यांचे वतीने सत्कार…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ला : दि. ०९ ज्या मुलीला बोलता व ऐकताही येत नाही, त्या पुजा धुरीने नॉर्मल मुलांच्या कॉलेजमधुन यश मिळवले बद्दल दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी चालवलेली महाराष्ट्रतील सर्वात मोठी संस्था राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र या अपंग संस्थेतर्फे वेतोरे येथील कर्णबधिर पुजा रूपाजी धुरी हिने कलाविश्व महाविद्यालय सांगली येथन चित्रकलचीउच्य जी डी आर्ट – पेंटींग परिक्षेत प्रथम श्रेणीसह ६५% गुण मिळवून ऊत्तीर्ण झाली.
कर्णबधिर मुलींमधून महाराष्ट्रात प्रथम आली. या ऊत्तुंग यशाबद्दल वेतोरे येथील तीच्या घरी जाऊन महासंघाच्या वतीने राज्य उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील यांचे हस्ते चित्रकार पुजासह तिच्या आई – वडिलांचा सत्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळ बोर्डेकर, सचिव विनोद धुरी, सदस्य शामसुंदर लोट, अनिल शिंगाडे, लवू परब, अनिल पाटील, ऊर्मिला चव्हाण, विनयक चव्हाण मंजिरी धुरी, प्रथमेश धुरी व गुरूनाथ धुरी उपस्थित होते.
सत्कारा दरम्यान राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष कलाशिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील यांनी दिव्यांग पुजा धुरी हिच्या व्यावसायीक पुणर्वसनाची सर्व जबाबदरी घेणार. तसेच तीच्या चित्रांचे प्रदर्शन लवकरच महासंघाच्या सहकार्याने करून तीच्या कलेला प्रोत्हाहन देणार असल्याचे सांगितले.
पर्यटणाच्या दृष्टीने सिंधु दर्ग जिल्यातील पुजा धुरी या दिव्यांग चित्रकाराची पहिली आर्ट गॅलरी बोलका कुंचला या नावाने वेतोरे येथे पुजा धुरी हिच्या घरी सुरू करण्यासाठी सर्व ती आर्थिक मदत पुजाचा तीचा कलाशिक्षक व दिव्यांग प्रतिनिधी या नात्याने स्व:ता बाळासाहेब पाटील हे मदत करणार असल्याचे सांगीतले. महत्वाचे म्हणजे पुजाचे आई – वडिल हे दोघेही पुजासारखेच मुकबधिर आहेत.
या वेळी बाळ बोडकर, विनोद धुरी, अनिल पाटील, मंजिरी धुरी व गुरूनाथ धुरी यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपंग मित्र अनिल पाटील यांनी केले, तर धुरी परिवाच्या वतीने गुरूनाथ धुरी यनी महासंघाच्या पदादीकार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शेवटी शामसुंदर लोट यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

