तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी चांगलेच आक्रमक…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि.१५ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी बस स्थानकास भेट दिली होती.परंतु परिवहन मंडळाचा सुरू असलेला अनागोंदी कारभार पाहिल्याने सर्वच पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी सर्व पदाधिकारी आगर प्रमुख वैभव पडोळे यांच्या भेटीसाठी गेले असता. ते न भेटल्याने सर्व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
यावेळी वैभव पडोळे यांच्याशी संपर्क केला असता आपण बाहेर गेलो असून, उद्या सकाळी १० वाजता भेटु, असे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उद्या सकाळी १० वाजता स्थानकात न भेटल्यास सर्व बस स्थानकात अडवून ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
यावेळी स्थानकांची परिस्थिती गंभीर असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बस स्थानक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही आहे. तसेच येथील बस देखील वेळेत सुटत नसल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याने, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी चांगलेच आक्रमक झालेले होते.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, अशोक पवार, आशिष कुलकर्णी, आसिफ शेख, राजू धारपवार, पप्पू शेख, सुरेश वडार, संतोष जोईल, कौतुक नाईक, नवल साटेलकर, अमर धोत्रे, भरत गांवकर, संकेत शेटकर आदी उपस्थित होते.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

