महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी पुढे यावे…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनीधी : गणेश तोडकर
🎴 कणकवली : दि. १३ पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार उद्या दि.14 मार्च 2021 पासून सदस्य नोंदणी अभियानाचा सुरवात होत असून नोंदणीचा शुभारंभ पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे हस्ते मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा मनसे सदस्य नोंदणी अभियान सुरुवात पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे उपस्थितीत कणकवली तेलीआळी येथील मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात होणार आहे.
सदस्य नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार असून आगामी काळात तालुकास्तरावर नोंदणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, मराठी भाषा, मराठी अस्मिता व मराठी बाणा जपत महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास उराशी बाळगणाऱ्या जिल्ह्यातील तरुण तरुणींनी अधिकृतरित्या पक्षाचा सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी करून पक्ष संघटनेच्या माध्यमातून या क्रांतिरुपी नवनिर्माणाच्या लढाईत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

