भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरवडे वासीयांना दिलेला शब्द पुर्ण केला…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ११ भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरवडे वासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला. वरवडे श्री. देव पायकांडा ते श्री. देव लिंगेश्वर मंदिर ( लिंगाची भाटी ) या पायवाटेचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सरपंच श्री. बांदल यांच्या हस्ते, तर मुकुंद परब यांच्या घरी जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले.
आमदार नितेश राणे यांनी या पायवाटेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द वरवडे वासीयांना दिला होता. मात्र कोरोनामुळे या पायवाटेचे काम प्रलंबित राहिले होते. विकासनिधी प्राप्त होताच प्रथम माझ्या गावच्या वडीलधाऱ्यांची मागणी पूर्ण केली आहे. यापुढेही माझ्या वरवडे गावातील ग्रामस्थांच्या विकासात्मक कामांची मागणी नेहमीच पूर्ण करेन अशी ग्वाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली.
यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, सरपंच बांदल, मधुकर परब, चंद्रकांत परब, शिवराम परब, अशोक परब, भारती हेगडे, सुनील परब, हेमंत परब, प्रभाकर परब, सादिक कुडाळकर, विजय कदम, दशरथ घाडीगांवकर, प्रकाश परब, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

