चिपळूण नगरपालिकेने दिलेल्या “त्या” बेकायदेशीर इमारतीचा परवाना रद्द करावा – खालीद अब्दुल कादीर मुकादम
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण : दि. १० नगरपालिकेने बेकायदेशीरपणे इमारत परवाना देवून शेत जमिनीमध्ये भराव टाकून रस्ता तयार करुन अतिक्रमण केल्याबाबत खालीद अब्दुल कादीर मुकादम याांनी ना.प्राजक्त तनपुरे नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे थेट तक्रार करून सदर इमारतीची परवानगी रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे.तसेच ९ मार्च २०२१ रोजी नगरपालिकेने सदर बांधकामास स्थगितीचे पत्र दिलेले असताना देखील त्याचे कामकाज सुरूच आहे.याबद्दल सदर बांधकाम व्यावसायिका विराधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी खालिद मुकादम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सामाईक मालकीच्या जमिनिपैकी मुकादम यांच्या मालकीची शेतजमीन आहे .मुकादम यांच्या मिळकतीच्या पाठीमागील बाजूस रफिउद्दीन बहाव कास्कर,अमिन वहाब कास्कर व अमिना झाहीद कोलथरकर यांची व मुकादम यांची सामाईक मिळकत आहे .सदर सामाईक मिळकतीचा वाटपाचा दावा जिल्हा दिवाणी कोर्टात अपिलामध्ये प्रलंबित आहे .सदर जमीन आरीहंत वास्तुनिर्माण करिता सुरेश गुंदेचा यांना विकसित करण्यासाठी दिलेली आहे . व त्यांनी त्या ठिकाणी इमारत बांधण्याचे काम सुरु केले आहे. आरीहंत वास्तुनिर्माण यांनी इमारत बांधण्यास सुरुवात करण्यापूर्वी नगर परिषद चिपळूूण यांच्याकडे चुकीचे व बेकायदेशीर कागदपत्र सादर करुन इमारतीच्या बांधकामाला परवानगी मिळण्यासाठी अर्ज केलेले होता .मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे खोटी य बनावट कागदपत्र सादर करून त्यांच्याकडून इमारतीची परवानगी घेतलेली आहे .
प्रत्यक्षात इमारतीची परवानगी घेण्यापूर्वी जागेला येण्या जाण्यासाठी रस्ता असल्याचे दाखविणे आवश्यक होते . परंतु खोटी व बनावट कागद जोडून प्रत्यक्षात नियोजित इमारतीकडे जाण्यासाठी चुकीच्या पद्धतीने बिल्डरने रस्ता दाखविलेला आहे व त्याची कोणतीच शहानिशा नगर परिषद यांनी केलेली नाही . प्रत्यक्षात सिटी सर्वे अंतर्गत डेव्हलपमेंट प्लॅन चिपळूण शहराचा तयार करण्यात आलेला आहे व त्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या आधार वर नमूद केलेल्या जमिनीच्या बाजूला आपटे यांच्या जमिनीतून नियाजित ररता जाणार आह .
परतु सदर नियाजित रस्त्यासाठी मालकाकड़न जमिन ताब्यात पण्याची काणतीही प्रक्रिया नगर पालिककडून सुरु झालेली नाही व त्यामुळे सुरेश गुंद यानं माइो मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करुन बेकायदेशीरपणे भराव करुन अनधिकृतपण जोरजबरदस्तीने रस्ता तयार केला व त्यामुळे माझ्या शेत जमिनीचे अतोनात नुकसान झालेले आहे . सदर रस्त्याचे काम सुरु असताना दैनिक सागरच्या दिनांक १५ / ० ९ / २०१८ च्या अंकामध्ये वकीलांमार्फत नोटीस देवून ही सुरेश गुंदेचा यांनी न जुमानता धाकदपटशा दाखवून कायद्याची कसलीही पर्वा न करता बकायदेशीरपणे रस्ता तयार केला .
तरी रफिउद्दीन वहाब कास्कर अमिन वहाब कारकर व अमिना झाहीद कोलथरकर व आरीहंत वास्तुनिर्माण करिता सुरेश गुंदेचा यांनी माझे जमिनीत अतिक्रमण करुन जागेचे अपरिमीत नुकसान केलेले आहे व चिपळूण नगरपरिषद यांना यांची पूर्ण कल्पना असताना व कोणताही अंतर्गत रस्ता नसताना चुकीच्या पद्धतीने परवानगी दिली आहे . या सर्व व्यक्तींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट परवानगी घेवून माझी घोर फसवणूक केलेली आहे व जागेचे अपरिमीत नुकसान केलेले आहे . तरी त्याची सखोल चौकशी करुन नगर परिषद चिपळूण यांनी अरिहंत वास्तु निर्माण यांना इमारतीच्या बांधकामास दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी व माझ्या शेतजमिनीमध्ये अतिक्रमण करुन भराव टाकून रस्ता तयार केल्याबद्दल फौजदारी कारवाई करावी.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला