वाणीआळी रस्त्याबाबत नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आहे त्या स्थितीत काम सुरू करण्याचे आश्वासन
◼️ठेकेदार बिल अडकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलात
◼️ऐन शिमग्यात रस्त्याचा विषय तापणार की होणार?
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण : दि. ०९ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ वाणीआळी येथील मुरलीधर मंदिर ते राऊतआळी गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता येत्या पावसापूर्वी होणे खूप गरजेचे आहे. सदरचा रस्ता अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे. गेली तीन ते चार वर्षापासून या रस्त्याची खूप चाळण झाली असून, त्याचा त्रास समस्त नागरिक आणि इतर भागातील रहिवाशांना होत आहे. हा रस्ता पवार आळी, दादर मोहल्ला, मिठागरी मोहल्ला, मुरादपूर, रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र हायस्कूल व महाविद्यालय इत्यादी भागामध्ये जाण्यासाठी मुख्य रहदारीचा रस्ता आहे. परंतु हा रस्ता गेले ४ वर्षांपासून पूर्णपणे खडबडीत व खड्डेमय झालेला आहे. त्यावर मागील ४ वर्षे कोणतेही डांबरीकरण झालेले नाही.
सदर रस्ता करणेसाठी फेब्रुवारी २०१ ९ मध्ये ठेकेदार आले होते. त्या वेळेस तेथील गटाराची अवस्था दयनीय स्वरुपाची होती परंतु, गटार झाले शिवाय रस्ता होऊ नये. असे स्थानिक नागरिकांची मागणी असलेमुळे काम स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर नवीन गटाराचे काम नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आणि नवीन रस्ता करायचा होता म्हणून गटाराची उंची जुन्या रस्त्यापेक्षा ६ इंच जास्त ठेवण्यात आली व त्यानंतर मार्च २०२० मध्ये रस्त्याच्या ठेकेदाराने रस्त्याचे काम पुन्हा चालु केले असताना ते काही कारणास्तव थांबण्यात आले. तरी आपण या विषयामध्ये स्वत: विशेष लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी निदान हा रस्ता करुन देण्याबाबतच्या सुचना द्याव्यात. अशा स्वरूपाचे निवेदन प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना दिले.
यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे गटनेते व उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व स्थानिक नगरसेवक बिलाल पालकर उपस्थित होते. यावेळी प्रभाग ५ मधील पंकज कोळवनकर, माजी नगरसेवक संजय रेडीज, सचिन शेट्ये, सुमित गुढेकर, धीरज खेडेकर, मंगेश शेट्ये, निलेश खातू, अमोल टाकळे, योगेश कोलगे आदी नागरिकांनी परिसरातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी उपस्थित गटनेते, तसेच शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून आहे. त्या स्थितीत कामकाज सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला