कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

आचरे देवस्थान विषयी

*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*

*🎴कसाल **

*आचरे…. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक संस्थानी थाटाची पाश्वभूमी असलेले आणि ग्रामदैवत श्री देव रामेश्वराच्या कृपाछत्राखाली गुण्यागोविंदाने नांदणारे एक निसर्गरम्य गाव. **

आचरे गावात साजरा होणारा प्रत्येक सण व उत्सव एक प्रकारचा संस्थानी थाटातच पार पडतो. त्यामध्ये गणेशोत्सव, राम नवमी ,महाशिवरात्र आणि दर तीन वर्षांनी साजरी होणारी गावपळण आणि डाळपस्वारी या सण-उत्सवांचा समावेश होतो.
कोकणात विशेषतः दक्षिण कोकणातील देव गाव रहाटी प्रमाणे दरवर्षी किंवा दर तीन वर्षांनी आपल्या सर्व लवाजम्यासह सहित गावातील प्रत्येक वाडीवाडीवार भेट देतात यालाच डाळपस्वारी असे म्हणतात. आमच्या आचरा गावाची डाळपस्वारी राजेशाही थाटाची व आगळी वेगळीच असते.
आचरा गावाच्या डाळपस्वारीचा नावलौकिकही सर्वत्र झालेला आहे. डाळपस्वारीच्या वेळी रामेश्वर देवस्थानाचे देवतरंग यामध्ये रामेश्वर, रवळनाथ, पावणाई, काळकाई आणि विठ्ठलाई आपल्या शाही लावजम्यासहित सनईच्या तालासुरात वाजत गाजत प्रत्येक वाडी वाडी वार प्रवेश करतात. डाळपस्वारी चा मुहूर्त ठरल्यावर ज्या ज्या रस्त्याने किंवा पायवाटेने ‘श्रींचे ‘ आगमन होणार असते ते सर्व रस्ते आणि पायवाटा श्रमदानाने स्वच्छ केले जातात. त्यावेळी संपूर्ण आचरा गाव एखाद्या नववधू प्रमाणे नटलेला असतो. यावेळी एखाद्या ग्रामस्वच्छता अभियानाला मागे टाकेल अश्या स्वरूपाची स्वच्छता व सौंदर्य डाळपस्वारीच्या माध्यमातून आचरे गावाला प्राप्त होते. डाळपस्वारीच्या काळामध्ये जवळपास 5 ते 6 दिवस श्री देव रामेश्वर या नावाभोवती आचरा गाव फिरत असते. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
डाळपस्वारीच्या निमित्ताने श्री देव रामेश्वराच्या सोबत आलेल्या भाविकांसाठी वाडीवाडीवार महाप्रसाद,चहापान, गुळपाणी ,सरबत आदींची व्यवस्था केली जाते. त्यामध्ये हिर्लेवाडी, पारवाडी, जामडुल येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. डाळपस्वारीच्या तिसऱ्या दिवशी श्री देव रामेश्वर आपल्या देवतरंग व लवाजम्यासहित रात्रीच्या प्रहरी हिर्लेवाडीत प्रवेश करतात. त्यावेळी शिवापुरच्या बांध घाटीतून माडाच्या बनात व शेतमळ्यात केलेली रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी चैतन्यमय सोहळा सारखीच असते.
श्रींचे आगमन हिर्लेवाडीत झाल्यावर श्रींची आज्ञा घेऊन आलेल्या सर्व मंडळींना महाप्रसादाची सोय केली जाते. त्याचप्रमाणे हिर्ले वाडीतील सर्व सुवासिनी महिला हातात तळी घेऊन श्रींच्या स्वागतासाठी सज्ज असतात. श्रींचे आगमन होताच सर्वत्र त्यांच्या नावाचा जयघोष सुरू होतो. पौराणिक कारकिर्दी प्रमाणे तोफेची सलामी देत व त्यांच्या हाती मानाचे श्रीफळ सोपवून वाजत गाजत त्यांचे स्वागत केले जाते. श्रींच्या आशीर्वाद घेण्यासाठी अथांग गर्दी उसळलेली असते. सगळा आसमंत ह्या भक्तिरसात बुडलेला असतो. पुढे देवांचे वास्तव्य हे आमच्या इथून जवळच असलेला ब्राम्हण देवळात असते. देवळाचा परिसर एकदम सजवलेला असतो.
आचरे गावच्या ह्या डाळपस्वारीचा आणखी एक विशेष म्हणजे ही डाळपस्वारी सामाजिक ऐक्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे एक प्रकारचे वेगळे उदाहरण आहे. त्याला कारण ही तसेच आहे. आमच्या गावात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि या डाळपस्वारीला सर्व धर्मीय लोकांचा समावेश असतो. श्री देव रामेश्वराच्या डाळपस्वारीने बाग जामडुल या बेटावर प्रवेश केल्यावर तेथील जेरोन आणि मोतेश फर्नांडिस या बंधुंकडून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे जेव्हा श्रींची स्वारी ही पिरावाडीमध्ये व काझीवाड्यामध्ये प्रवेश करते. तेव्हा मुस्लिम बांधवांचे आदराचे स्थान असलेल्या पिराला प्रथम श्रीफळ अर्पण केले जाते. अश्या प्रकारे आचरा डाळपस्वारीचा सोहळा सामाजिक बांधिलकी व सलोखा जपणारा दीपस्तंभच आहे असे म्हणले तरी चालेल.
आचरे गावातील डाळपस्वारी ही प्रथा अतिशय पूजनीय आहे. डाळपस्वारी म्हणजे देवांनीच माणसा माणसाची घडवलेली भेट असते. म्हणूनच डाळपस्वारीचे हे 5 दिवस आचरे वासियांसाठी भावभक्तीने मंतरलेले असतात. म्हणूनच एकदा तरी ही डाळपस्वारी जरूर अनुभवावीच…..

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!