◾ सावंतवाडीतील प्रतिष्ठित पोल्ट्री व्यावसायिक मोजेस डिसोझा यांची आत्महत्या
🖥️ Kokan Live Braking News
- ✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴 सावंतवाडी,दि-१०:- सावंतवाडीतील प्रतिष्ठित पोल्ट्री व्यावसायिक मोजेस ऍंथोनी डिसोजा यांनी अलीकडेच खरेदी केलेल्या कारिवडे डंग वाडी रस्ता येथील बागेतील विहीरीत आत्महत्या केल्याचे प्रकार उघडकीला आला आहे्
सदरची जमीन काही वर्षापूर्वीच डिसोझा यांनी खरेदी केली होती. आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या अंगातील शर्ट ,मोबाईल, चप्पल विहिरीच्या बाहेर काढून ठेवले होते, नेमकी त्यांनी कशासाठी आत्महत्या केली याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही.सदरच्या जागेत पूर्वु धनगरांची वस्ती होती व झोपड्याही होत्या काही वर्षा पूर्वी त्या झोपड्यांमध्ये शंभरच्यावर बकरी आग लागून आगित भस्मसात झाली होती.

