रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे ओरोस येथील वाचनालयास इंग्रजी पुस्तके वाटप कार्यक्रम
*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
*🎴कसाल*
*रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे ओरोस येथील वाचनालयास इंग्रजी पुस्तके वाटप कार्यक्रम **
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे ओरोस येथील वाचनालयास इंग्रजी पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते, सेक्रेटरी उदय जांभवडेकर, खजिनदार नवीन बांदिवडेकर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने, सेक्रेटरी अभिषेक माने, माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, शशिकांत चव्हाण, प्रमोद भोगटे, कोकितकर सर, वाचनालयाचे ग्रंथपाल व इतर मान्यवर उपस्थित होते.
रविशंकर डोकोजू फाऊंडेशनच्या माध्यमातून गजानन कांदळगावकर यांच्या विशेष प्रयत्नाने उपलब्ध करुन देण्यात आलेली इंग्रजी पुस्तके ओरोस वाचनालयास अमूल्य ठेवा आहे याचा लाभ ग्रामीण भागातील वाचकांना होईल असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष डॉ प्रशांत कोलते यांनी व्यक्त केले तर ओरोस कसाल रानबांबुळी पडवे या भागातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती एकत्र येऊन रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या प्रेरणेने व गजानन कांदळगावकर यांच्या पुढाकारातून नव्याने स्थापन झालेला रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या पहिल्या सुंदर उपक्रमास शुभेच्छा रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भविष्यात रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस ज्येष्ठ सदस्य कोकितकर सरांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन सेक्रेटरी उदय जांभवडेकर तर आभार खजिनदार नवीन बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

