भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴ओरोस : दि. ०९ अनुसुचित जाती आणि नवबौद्ध या घटकांसाठी असलेली नाविन्यपुर्ण योजना का राबवली नाही? याची चौकशी व्हावी. अन्यायग्रस्त न्हानु जगन्नाथ सरमळकर यांना तात्काळ पदोन्नती द्यावी. या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले, की नवबौद्धना तसेच मागासवर्गीयांना न्याय देताना नियम बदलतात का? असा प्रश्न उपस्थित करत आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनातुन त्यांनी न्हानु जगन्नाथ सरमळकर यांना पदोन्नती द्यावी. सामान्य प्रशासन विभागाने २७ नोव्हेंबर २०२० चे पदोन्नतीचे आदेश रद्द करावेत. अनुसुचित जाती आणि नवबौद्ध या घटकांसाठी असलेली नाविन्यपुर्ण योजना का राबवली नाही? यासाठी चौकशी समिती नियुक्त करावी. सर्वसामान्य गटाच्या नावाखाली नाविन्यपुर्ण योजनेतुन झालेल्या १६ कोटी रुपये नियमबाह्य खर्चाची चौकशी करावी. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय मिळुन हापकिन संस्थेला मे २०१८ पासुन १ कोटी रुपये निधी देऊनही अद्यापही उपकरणे मिळालेली नाहीत, त्याची सखोल चौकशी व्हावी. अशा विविध मागण्या या आंदोलनातुन केल्या आहेत.
या मागण्यांसाठी रावजी यादव यांनी यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी सलग ६८ दिवस घंटानाद आंदोलन छेडले होते. तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या वेळी get छेडुन पालकमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
त्यानंतरही प्रशासनाकडुन कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. यामुळे रावजी यादव यांनी पुन्हा जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. याची दखल न घेतल्यास शुक्रवार १२ मार्च रोजी मुंडन करून न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे रावजी यादव यांनी म्हटले आहे.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

