उपोषण कर्ते रवी जाधव यांची प्रकृती खालावली.. डॉक्टरांना प्राचारण..
. सावंतवाडी नगर परिषदेने आपला गाळा काढून अन्याय केल्याप्रकरणी गेल्या तीन दिवसापासून उपोषण करत असलेले रवी जाधव यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. बीपी लो झाल्यामुळे तब्येत खालावल्याचज सांगण्यात आले
शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी ,शब्बीर मणियार, चित्रा देसाई, अपर्णा कोठावळे, अमोल साटेलक,र कृष्णा धुळपनवार ,यांनी तातडीने पाचारण केले, छातीत कळ मारू लागल्यो डॉक्टरांना बोलविण्यात आले. तीन दिवस अन्नपाण्याशिवाय उपोषण केल्यामुळे प्रकृतीवर परिणाम झाला असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. या सर्वांनी नगरपालिकेच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.

