भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला…
◼️बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाची टीम दाखल
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ला : दि. ०९ परुळे बाजार येथील मनोहर सामंत यांच्या विहिरीत पहाटे ५ च्या सुमारास बिबट्या पडला. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला कळविले, त्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची टीम परुळे येथे दाखल झाली.
भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला अंदाज न आल्यामुळे तो विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. आज मंगळवारी सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी ही गोष्ट पाहिली. त्यानंतर या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. गेले काही दिवस परुळे परिसरात बिबट्याची दहशत होती. अनेक पाळीव प्राण्यावर त्याने हल्ले केले होते. दरम्यान बिबट्या विहिरीत पडला समजताच परिसरात लोकांनी एकच गर्दी केली. या बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी ०९.१५ वाजता वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले, तसेच पोलिस ही दाखल झाले.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

