आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला राज ठाकरे यांनी दिलेल्या समर्थनाचे साळगावकर यांनी केले स्वागत

◼️कोकणच्या विकासासाठी प्रकल्प येणे गरजेचे – साळगावकर

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी : दि. ०९ देशात व राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न जटील होत असताना औद्योगिकरणाला विरोध केला जात आहे. मोठमोठे प्रकल्प आल्याशिवाय कोकणाचा विकास होणार नाही, हे आपले पहिल्यापासुनचे धोरण होते. म्हणुनच आपण रत्नागिरी येथे होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिले होते. त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी आपल्यावर टीकाही केली, मात्र गोरगरिबांच्या घरात चुल पेटली पाहिजे. म्हणुन आपण त्याची पर्वा केली नाही. त्यावेळी फक्त या रिफायनरीचे समर्थन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या भुमिकेचे आपण स्वागत करतो असे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.

नाणार ग्रीन रिफायनरी राजापूर – रत्नागिरी प्रश्न राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेचे स्वागत बबन साळगावकर राष्ट्रवादी नेते माजी नगराध्यक्ष यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामधील तरुणाला नोकरीच्या निमित्तानं गाव सोडुन मुंबई पुन्हा औरंगाबाद, तसेच हैदराबाद गोवा यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. तसेच काही तरूण पर प्रांतामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेले, त्या तरुणांच्या आई – वडिलांना एकटेपणाची जीवन जगावे लागत आहे. अशी भुमिका मांडुन ग्रीन रिफायनरीचे साळगावकर यांनी त्यावेळी समर्थन केले होते.

परंतु आज त्या काळामध्ये ही समर्थन केल्यानंतर पोटाच्या बेंबीपासुन ओरडुन विरोध करणारे स्वाभिमानी आता ग्रीन रिफायनरीचे समर्थन करत आहेत. दुरदृष्टी ठेवुन त्याचवेळी ग्रीन रिफायनरीला समर्थन दिले असते. तर ग्रीन रिफायनरी २० टक्के काम पुर्ण होऊ शकले असते, असे साळगावकर यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी आज समर्थन करतातच आहेत, तसेच राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेचा आम्ही स्वागत करतो. तसेच त्यावेळी बेरोजगार तरुणांच्या बाजूने उभे राहिलो, हे काळाने आज दाखवुन दिले. पुन्हा एकदा मी राज ठाकरे यांचे भुमिकेचे स्वागत करून सरकारने सकारात्मक पावले उचलुन सदर ग्रीन रिफायनरी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही. याची दक्षता घ्यावी. असे आवाहन बबन साळगावकर यांनी केले आहे.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!