क्वारीतील दगड डोक्यात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचे उपचारापुर्वीच निधन…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ०९ क्वारीतील दगड डोक्यात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचे उपचारापूर्वीच निधन झाले. माणताबाई बाबू जाधव (४५,रा.विजापूर) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास वेंगसर ता. वैभववाडी येथे ही घटना घडली. या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मयत जाधव ही वेंगसर येथील दगडाच्या क्वारीवर काम करीत होती. दुपारी जेवणाच्या वेळेत जेवणाचा डबा आणण्यासाठी ती तेथूनच जवळ असलेल्या जुन्या क्वारीजवळ गेली होती. यावेळी अचानक क्वारीच्या वरील बाजूचा दगड तिच्या डोकीत पडला, यात ती गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी श्रुती बाबू यांनी या घटनेची खबर ओरोस पोलीस ठाण्यात दिली. या मृत्यूचा तपास ओरोस पोलीस ठाण्यातून वैभववाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मारुती साखरे अधिक तपास करीत आहेत.
_🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
_🥏9405184052 🪀_
_🥏9421544545 🪀_
_📤..फोन न लागल्यास मेसेज करा!_
_🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग.._
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

