आणखीकोकणरत्नागिरीशासकीय

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलिसांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटिबद्ध – सैफ सुर्वे

◼संघटनेच्या माध्यमातुन पोलिसांचे असंख्य महत्वपुर्ण प्रश्न मार्गी…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळुण : दि. ०९ संपुर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीस बंधूंच्या न्याय हक्कासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगून आजपर्यंत शासनदरबारी पोलिसांचे प्रलंबित अनेक प्रश्न आपण मार्गी लावले असल्याचे, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सैफ सुर्वे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

पोलीस बॉईज संघटना गेली ४ वर्षे महाराष्ट्रभर कार्यरत असून १९ जिल्ह्यात चार लाख सभासद नोंदणी झाली आहे. येथे संघटनेचे यशस्वी कामकाज सुरू आहे. पोलीस संघटना स्थापन करू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून पोलिसांचे प्रश्न सोडवतो.

मध्यतरी एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचा प्रश्न गंभीर झाला होता. या वेळी आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना न्याय मिळवून दिला. फडणवीस सरकारच्या काळात आम्ही पोलीस हक्कासाठी मोठी आंदोलने केली, यात पोलिसांना १५% आरक्षण मिळावे, महसूल प्रमाणे वेतन मिळावे, हक्काचे घर द्या, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर अजामीनपात्र गुन्हे नोंद व्हावेत. या मुख्य मागणीसाठी मुंबईत आम्ही जोरदार निदर्शने केली. याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीविस यांनी महाराष्ट्र शासन गृहखात्याची कमिटी केली. त्यात आमचे राष्ट्रीय संस्थापक – अध्यक्ष राहुल धुमाळे यांना सदस्य म्हणून घेतले. आज हे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रगती पथावर काम सुरू असल्याचे सैफ सुर्वे यांनी सांगितले.

पोलीस कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या कुटुंबियांना १२०० आजारांवर मोफत उपचार मिळणार. मागील दिवाळी मध्ये १०० पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेतले. सुमारे अनुकंपवार १५० ते २०० मुले होती त्यांना नोकऱ्या मिळाल्या. यासह मुंबई पोलिसांनी ड्युटी ८ तास करावी, ही मागणी आम्ही निवेदन दिल्यावर मान्य झाली.

अशी माहिती देऊन आपण जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल धुबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकात भेट देऊन पोलिसांना संघटित करून त्यांच्या समस्या, शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे सैफ सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥_

_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️

♦संपादक : सीताराम गावडे

📱संपर्क : +919423304856

♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड

📱संपर्क : +919423958828

♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे

📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!