पोलीस प्रशासन राबवते हायवे मृत्युंजय दूत संकल्पना
पोलीस प्रशासन राबवते हायवे मृत्युंजय दूत संकल्पना
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
*🎴कसाल :*
आपण भारतीय सुजान नागरिक आहोत सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेले आहे रस्त्यांवर आपण मोटरसायकल किंवा अन्य वाहनांंनी प्रवास करतो. त्यावेळी नियमांची सक्ती केली जाते तुम्ही लगेचच पोलिस अधिकारी कर्मचारी यांना वाईट म्हणता. ते नियम तुमच्यासाठीच आहेत . शरीर हे महत्वाचे आहे शरीर विकत घेता येत नाही ही मौल्यवान वस्तू आहे या शरीराची काळजी घेणे आपल्या हातात आहे अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी या करीता “हायवे मृत्युंजय दूत “ही संकल्पना राबविली जात असून तुम्हीच त्याचे दुत आहात असे प्रतिपादन आर, नदाफ मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ आज कणकवली ओसरगांंव या ठिकाणी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस उपाधिक्षक आर, नदाफ मॅडम यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच ” हायवे मृत्युंजय दूत “पथक यांना ओळखपत्र रिफ्लेक्टर जॅकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक करताना अरुण जाधव म्हणाले राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांना राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघातातील जखमींना मदत मिळावी म्हणून ” हायवे मृत्युंजय दुत “योजना राबविण्याचा निर्णय १ मार्च पासून घेतला आहे. यामध्ये व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला आहे, पोलीस स्टेशन, दवाखाने, आदी नंबर दुतांकडे दिले जाणार आहे. सर्व महामार्ग पोलिसांच्या वतिने ही योजना राबविली जात असून चांगल्या कामांबद्दल दूतांचा सत्कार होणार आहे .आज आपल्या कणकवली ओसरगांंव , वाहतूक महामार्ग केंद्र येथे याची सुरुवात करत आहोत.
यावेळी पोलीस उपाधीक्षक आर नदाफ मॅडम म्हणाले आपण आपल्या कुटुंबातील भाऊ,.दादा, काका, मामा व मित्रपरिवारासोबत अनेक वाढदिवस साजरे करतो. या वाढदिवसाला इतर गोष्टी भेट वस्तू देण्यापेक्षा एक नवीन ट्रेंंड चालू करा ती म्हणजे हेल्मेट भेटवस्तू म्हणून द्या अन्य वायफळ खर्च करण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला हेल्मेट वस्तू द्या बाजारात अनेक गोष्टी विकत मिळतात मात्र शरीर विकत मिळत नाही शरीर हे मौल्यवान वस्तू आहे.काळजी घ्यावी. असेही कार्यक्रमात जमलेल्या उपस्थितांना.पोलीस उपाधीक्षक आर, नदाफ मॅडम यांनी सांगितले.
यावेळी रोटरी कणकवली क्लबचे डॉक्टर पावसकर म्हणाले हेल्मेट डोक्यावर का असावे प्रवास करताना आपला जीव हा महत्त्वाचा असतो समोरून येणाऱ्या वाहनाची आपल्याला माहिती नसते, यावषी कोरोना महामारीचा रोगापेक्षा अपघाताच्या मृत्यूचा दर जादा झाला आहे. त्यामुळे काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे, चुकीच्या दिशेने किंवा समोरून येणारा आपणास धडक देऊ शकतो आपण जखमी होतो डोक्याला मार लागू नये यासाठी हेल्मेटचा वापर करावा ,मेंदू हा सर्वात महत्त्वाचा शरीराचा भाग हे शरीराच्या दुसऱ्या वस्तू कोणत्याही विकत घेता येतील मात्र मेंदू विकत घेता येत नाही आपण आपली काळजी घ्यावी. अति वेगाने गाडी चालवू नये मोबाईल कानाला लावून बोलू नये. दारू पिऊन गाडी चालवणे हे सर्व टाळावेत.
यावेळी ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, ओसरगाव उपसरपंच बबली राणे, कणकवली रोटरी क्लब चे डॉक्टर पावसकर आदी उपस्थित होते तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.
खारेपाटण ते पात्रदेवी, आंबोली, वेंगुर्ला, वैभववाडी, कणकवली ओसरगांंव, कसाल, फोंडाघाट ,आदी ठिकाणच्या सर्व “मृतुंजय दुतांकडे” पीएसआय नदाफ मॅडम यांच्या हस्ते ओळख पत्र देण्यात आली. तर पोलिसांच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमावेळी शालेय विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_