कोकणक्राइमसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात येण्याची केली सूचना

दारूने भरलेल्या गाडीचा पाठलाग करताना झाला होता अपघात..

प्रकरण अंगलट येताच तपासाठी दिले होते सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात.

ब्यूरो न्युज:२४ – राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांनी२८-१०-२०२० रोजी रात्रीच्या वेळी गोवा बनावटी दारु भरलेल्या गाडीचा पाठलाग करून ५० लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला होता. यावेळी गाडीचा पाठलाग करताना सदर गाडीचा अपघात होऊन गाडी चालक नासीर राजगुरू जखमी झाला होता त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क गाडीचे सारथ्य दोन नंबर धंद्याशी निगडित इसम करत असल्याचा आरोप राजगुरू यांनी केल्यावर सदरचा तपास सिंधुदुर्ग पोलीस यांच्याकडे देऊन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नामानिराळे झाले होते.
मात्र सिंधुदुर्ग पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक तडवी यांना या गुन्ह्याच्या तपासासाठी आपल्या कार्यालयातील निरीक्षक एस के दळवी दुय्यम निरीक्षक काळे, एस एस थोरात, डी एम वायदंडे ,सहाय्यक दुय्यम निरीक्षक कदम ,डीआर वायदंडे ,आर डी ठाकूर ,आर एस शिंदे, एच आर वस्त, यांना या गुन्ह्याचा तपास कामी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे पुन्हा रजिस्टर नंबर ३३/२०२० भादवि कलम २७९ ३३७ मो बा कलम १८४ प्रो व्ही ॲक्ट १९४९ चे कलम ६५, १८३नुसार‌ गुन्हा दाखल करण्यात आला होता.खर तर हा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाने करणे बंधनकारक होते मात्र गाडीचा पाठलाग करताना अपघात झाला व चालक नासीर राजगुरू यांचा हात मोडला गेला तेव्हा पोलीस अधीक्षक तडवी यांच्या गाडीचे सारथ्य खासगी माणूस करत होता व तो ही नंबर धंद्याशी निगडित होता.नियमा प्रमाणे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना गाडीचा पाठलाग करण्याचे अधिकार नाहीत असे असताना गाडीचा पाठलाग केला गेला तेव्हा हे प्रकरण आपल्यावर शेकेल म्हणून सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आले अखेर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना बोलावणे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!