वेंगुर्ला वीज मंडळ अधिकाऱ्यांकडुन पालकमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
▪️ऑनलाइन अभ्यासक्रम असताना अनेकांच्या घरातील वीज कनेक्शन तोडली
🖥️Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला : दि. ०४ जगावर, देशावर व महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे सावट असताना; त्या संकटातुन देश, राज्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकही अतिशय कठीण परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाने आपल्या परवानगीशिवाय कोणाची विद्युत कनेक्शन तोडु नये. असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देऊनसुद्धा, वेंगुर्ला अभियंता तसेच कर्मचारी तेथील नागरिकांना त्रास देत आहेत. त्यांची वीज तोडण्याचे काम करीत असल्याने ऑनलाइन अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर संकट कोसळले आहे. तरी अशा अधिकाऱ्यांवर आणि लाईनमनवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांतुन केली जात आहे.
वाढीव वीजदराबाबत सर्वत्र विरोध होत असताना, बिल भरु नये असे आवाहन केलेले आहे. यावर पालकमंत्र्यांनी आपल्या आदेशाशिवाय कोणाचीही वीज जोडणी तोडु नये असे आदेश दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम वेंगुर्ला विद्युत पुरवठा अधिकारी विजय खटावकर, कार्यालयातील अधिकारी, तसेच त्यांचे लाईनमन यांनी केले असुन. घरोघरी फिरून विज बिल भरण्याची जबरदस्ती केली जात आहे. जर ग्राहकांनी वीज बिल भरण्यास नकार दिला, तर त्यांची विज तोडण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
ग्राहकांशी उद्धटपणे वागणाऱ्या अशा लाईनमनवर, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शेजारच्या राज्यात स्वस्त दराने वीज पुरवठा केला जातो, मात्र महाराष्ट्र राज्यात चढ्या दराने वीज पुरवठा होतो. याचा अर्थ काय? असा सवाल नागरिकांमधुन विचारला जात आहे.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला

