कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव तेलकाटावाडी येथील दोन दिवसीय तेलकाटा उत्सव उत्साहात संपन्न.

*🛑मळगाव तेलकाटावाडी येथील दोन दिवसीय तेलकाटा उत्सव उत्साहात संपन्न.*

 

*🛑संगीत स्वरसंध्या, बालनाट्य व ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाची पर्वणी.*

 

*🛑सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* मळगाव तेलकाटावाडी येथे सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय ‘तेलकाटा उत्सव’ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या उत्सवात संगीत स्वरसंध्या, सामाजिक संदेश देणारे बालनाट्य तसेच पौराणिक ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाची रंगतदार मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.

उत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेशमूर्ती व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करत करण्यात आले. यावेळी मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावचे माजी मुख्याध्यापक वैद्यनाथ देवण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रंगमंचाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निवेदक राजा सामंत, पुरुषोत्तम परब, हर्षल मेस्त्री, कौस्तुभ धुरी, विनोद देऊलकर, प्रसाद पांगम, सूयोग कला रंगमंचचे अध्यक्ष नंदकिशोर ऊर्फ पप्पू मुळीक, ॲड. अंकुश ठाकूर, तसेच तेलकाटावाडी ग्रामस्थ बाळा राऊळ, विजय गवंडे, विजय खानोलकर, लक्ष्मण राऊळ, नामदेव नाटेकर, गजानन लातये आदी मान्यवरांसह सुयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वैजनाथ देवण यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाला शुभेच्छा देत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘स्वरसंध्या’ हा सुमधुर संगीत कार्यक्रम पार पडला. यामध्ये गायक बुवा पुरुषोत्तम परब, हर्षल मेस्त्री व कौस्तुभ धुरी यांच्यात तिरंगी संगीत जुगलबंदी रंगली. गायनाला तबल्यावर विनोद देऊलकर व पखवाजावर सचिन पांगम यांनी उत्कृष्ट साथ दिली. या मैफलीने श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. या संगीत मैफिलीचे उत्कृष्ट निवेदन राजा सामंत यांनी केले.

यानंतर तेलकाटावाडीतील बालकलाकारांनी सादर केलेल्या “हसत खेळत उपदेश जीवनाचा” या सामाजिक संदेश देणाऱ्या बालनाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नाट्यप्रयोगातून बालकलाकारांनी अभिनयाच्या माध्यमातून जीवनमूल्यांचा प्रभावी संदेश दिला.

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी लोकराजा सुधीर कलिंगाण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर (कुडाळ) यांचा ‘एकपदा अर्थात पृथ्वीकंकण’ हा ट्रिकसीनयुक्त पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. नेत्रदीपक ट्रिकसीन, प्रभावी अभिनय व सशक्त कथानकामुळे हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.

या नाट्यप्रयोगा दरम्यान कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलिंगण यांना महाराष्ट्र राज्य युवा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंडळाच्यावतीने बाळा राऊळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पप्पू मुळीक, ॲड. अंकुश ठाकूर, सहदेव राऊळ, श्रीकृष्ण लातये, लक्ष्मण राऊळ, संतोष गावडे आदी उपस्थित होते. या संपूर्ण तेलकाटा उत्सवामुळे मळगाव तेलकाटावाडी परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली होती. सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळ यांच्या एकजुटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!