कोकणमहाराष्ट्रवैभववाडीशैक्षणिकसिंधुदुर्ग

आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया ला नॅक कडून अ दर्जा

 

*तिसऱ्या टप्प्याच्यामूल्यांकनासाठी बेंगलोर होऊन त्रिसदस्यीय समिती झाली होती दाखल*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴वैभवाडी :*
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयला नँक कडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात अ दर्जा प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण व व्यवसायभिमुख उपक्रम राबविणाऱ्या या महाविद्यालयाला अ दर्जा प्राप्त झाला ही वैभववाडीसाठी आनंदाची बाब आहे. संस्था अध्यक्ष, माजी मंत्री विनोद तावडे, सर्व संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व वैभववाडीवासिंय यांच्या सहकार्यामुळेच महाविद्यालयाला हे मोठे यश मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी स्थानिक अध्यक्ष सज्जन रावराणे, संजय रावराणे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या तिसऱ्या टप्प्याच्या मूल्यांकनासाठी बेंगलोरहून त्रिसदस्यीय समिती दाखल झाली होती. त्या समितीमध्ये डॉ. सी. व्ही. रमण युनिव्हर्सिटी बिहारचे डॉ. आर. के. पांडे, सिक्कीम युनिव्हर्सिटीचे डॉ. सुभांसु शेखर महापात्र, उत्तराखंडचे डॉ. विनय आनंद बोराई यांचा समावेश होता.

या समितीने दोन दिवस महाविद्यालयातील सर्व विभागांची माहिती, उपक्रमांची माहिती जाणून घेतली. संस्था अध्यक्ष विनोद तावडे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी समितीचे स्वागत करून मूल्यांकनासाठी त्यांना पूर्ण सहकार्य केले.
महाविद्यालयातील आधुनिक टेक्नॉलॉजी, विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांशी संवाद, प्रत्येक विभागाला भेट, त्या प्रतिनिधीशी चर्चा, महाविद्यालयातील लँबचा होत असलेला वापर, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सेवासुविधा, रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत, ऑडिट रिपोर्ट ची माहिती, कॉलेजचा आत्मा समजल्या जाणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन कमिटी (आयक्युसी) ची माहिती, या समितीने जाणून घेतली. महाविद्यालयाच्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले. असल्याची माहिती डॉ. काकडे यांनी दिली.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!