कोकणशासकीय

एडगांवचे मंडळ अधिकारी दीपक पावसकर यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव

महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल एडगांवचे मंडळ अधिकारी दीपक पावसकर यांचा उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्काराने गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांच्या प्रामाणिक व पारदर्शक कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. जिल्हा प्रशासनाने श्री पावसकर यांचा केलेला सन्मान हा त्यांच्या प्रामाणिक व पारदर्शक कार्याची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया वैभववाडीवासियां कडून व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

श्री पावसकर यांनी कणकवली, देवगड तालुक्यात तलाठी म्हणून काम केले आहे. मागील वर्षी पदोन्नतीने ते वैभववाडी तालुक्यात नियुक्त झाले. एडगांव मंडळ अधिकारी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे जबाबदारीने त्यांनी काम केले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा राहीला आहे. काही सजे वरील अनेक प्रलंबित विषय नियोजनबद्ध पद्धतीने हाताळत ते मार्गी लावले आहेत. तलाठी व कोतवाल यांना विश्वासात घेऊन त्यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात मेहनत घेतली आहे. त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली आहे. पुढील काळात ही त्यांच्याकडून पारदर्शक कामाची जनतेला अपेक्षा आहे.

महसूल दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी रोहिनी रजपुत, रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पनवेलकर आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!