आम.दिपक केसरकरांच्या हस्ते माजगांव मधील विकासकामांची भुमीपूजन व शुभारंभ संपन्न
सावंतवाडी, दि.२६:- तालुक्यातील माजगांव मध्ये आज आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते माजगांव गोठवेश्वर मंदीर जवळील हायमास्ट लाईटचा शुभारंभ करण्यात आला तसेच माजगांव देऊळवाडी येथील सातेरी देवी मंदीराकडे जाताना मार्गावरील जीर्ण झालेल्या पूलाचे दुरुस्ती व नुतनीकरण विकासकामांचेही आज भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सरपंच दिनेश सावंत,जिल्हा बँक संचालक विकास सावंत, माजी उपसभापती चंद्रकांत कासार,अशोक दळवी,आबा सावंत,बाबू सावंत,संजय कानसे,रुपेश नाटेकर,बाळा राठोड,भारती कासार यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

