चवळी पिकाच्या नुकसानीची विचारणा केलेल्या शेतकरी दांपत्यावर प्राणघातक हल्ला
*▪️सातोसे रेखवाडी येथील घटना*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा :* बकरीच्या कळपाकडून सातत्याने केल्या जाणार्या चवळी पिकाच्या नुकसानीबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकरी दांपत्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सातोसे रेखवाडी येथे आज सायंकाळी घडली आहे. शेतकरी लक्ष्मण राघोबा पंडीत व पत्नी आरती यांच्यावर पाळ व कोयत्याने हल्ला करुन गंभीररीत्या जखमी केले आहे. याप्रकरणी संशयित भैरु गंगाराम झोरे (५०, रा. मडुरा तळेवाडी) याला बांदा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बांदा पोलीसात मुलगा अविनाश पंडीत यांनी माहिती दिली. संशयित भैरु याचा भाऊही मारहाणीत त्याच्या सोबतीला होता असे अविनाश याने पोलीसांना सांगितले. मात्र ति पोलीसांना सापडून आला नाही. जखमींवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. बांदा पोलीसात प्रभारी सहाय्यक निरीक्षक तौसिफ सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_