◼️ शासकीय ठेकेदार रोहित नाडकर्णी यांना मारहाण;मारहाण करणाऱ्या वर गुन्हा दाखल
सुतळीचा बॉम्ब फोडल्याबाबत विचारणा केली असता मारहाण
🖥️Kokan Live Braking News
✍️प्रतिनिधी:बांदा
🎴बांदा, दि-२६:- शाळेसमोर व घरासमोर सुतळी बॉम्ब फोडल्याबाबत विचारणा केली असता शासकीय ठेकेदार रोहित देविदास नाडकर्णी (४४,गाळेल भटवाडी) यांना सुऱ्याने मारहाण केली. यात नाडकर्णी यांना हाताला व खांद्याला दुखापत झाली. या प्रकरणी नाडकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आकाश उल्हास नाईक (25, चव्हाटा- गाळेल)याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, गुरुवारी 25 रोजी आकाश नाईक याने गाळेल शाळेसमोर आणि घरासमोर सुतळी बॉम्ब फोडले.यावेळी गावातील इतरांशी वाद करण्यात आले.म्हणून रात्री साडेअकराच्या सुमारास आकाश यांच्या घरी नाडकर्णी यांनी इतरांसोबत जात विचारणा केली असता आकाश नाईक यांनी पाठीमागून येत हातातील सुऱ्याने डाव्या हातावर व उजव्या खांद्यावर दुखापत केली अशी तक्रार नाडकर्णी यांनी बांदा पोलीसात दिली यावरून आकाश उल्हास नाईक याच्या विरोधात मारहाणीचा 324, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

