कातकरी आदिवासी समाजातील पुरुषांसह महिलेला फोंडाघाट वनक्षेत्रातील वनरक्षकांकडुन दांड्याने बेदम मारहाण

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :रविकांत जाधव*

*🎴 :कणकवली* कातकरी आदिवासी समाजातील पुरुषांसह महिलेला फोंडाघाट वनक्षेत्रातील वनरक्षकांकडुन दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित कातकरी आदिवासीं यांना न्याय मिळावा यासाठी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, ऍड. सुदीप कांबळे, वंचितचे कासले यांनी त्यांना काल रात्री कणकवली पोलीस ठाण्यात आणुन पोलिसांकडे दाद मागितली आहे. तसेच या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती मोडक यांनी दिली.

फोंडाघाट वनक्षेत्रात काही कातकरी पुरुष आणि महिला आढळल्याने त्यांना जंगलातच वनरक्षकांनी दांड्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर फोंडा वनपाल कार्यालयात नेत तिथेही मारहाण केल्याचे मोडक यानी सांगितले. जर त्या कातकरी बांधवांकडुन काही आगळीक झाली असेल, तर त्यांच्यावर रीतसर कायद्याने कारवाई करण्याऐवजी त्यांना मारहाण करणे कुठल्या कायद्यात बसते? असा सवाल मोडक आणि ऍड. सुदीप कांबळे यांनी विचारला आहे. कातकरी बांधवाना अमानुष मारहाण करणाऱ्या वनकायद्याचे रक्षक असणाऱ्या त्या वनरक्षकांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करावा. अशी मागणी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक आणि या ॲड. सुदीप कांबळे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्याकडे केली आहे. या अन्यायाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागणार असल्याचेही मोडक यांनी सांगितले. आता यावर पोलीस काय कारवाई करतात ? जिल्ह्याचे डीएफओ कातकरी बांधवाना मारहाण करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांवर काय ॲक्शन घेतात? हे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!