नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरी बाबत आपली दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे ; माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत
🛑 नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरी बाबत आपली दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे ; माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-३१:- राजापूरच्या ग्रीन रिफायनरीला जनतेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेने विरोध केला होता. आता ग्रीन रिफायनरी ला समर्थन आणि विरोध अशी भावना जनतेची आहे. शिवसेना ग्रीन रिफायनरी बाबत जनतेसोबत होती आणि यापूढेही राहील. नितेश राणेंनी काँग्रेस आणि स्वाभिमानमध्ये असताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरी बाबत आपली दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे.
ग्रीन रिफायनरी मुळे देवगडमध्ये नितेश राणेनी जनतेला कॅन्सर होईल असे म्हटले होते, मग आता कॅन्सर कसा होणार नाही हेही सांगावे असे आव्हान माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिले. पक्ष बदलला की तत्वे बदलणाऱ्या आणि पक्षाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलणाऱ्या नितेश राणेंनी मतांवर डोळा ठेवून रिफायनरी ला विरोध केला होता हे आठवावे. नितेश राणेंच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातील भाषणाची कात्रणेच सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. रिफायनरीचे दलाल म्हणून प्रमोद जठार यांना हिणावणाऱ्या नितेश राणेंनी आता त्यांचेच नेतृत्व रिफायनरी साठी मान्य केले आहे. आपल्या नातेवाईकांना रिफायनरी मुळे कॅन्सर होईल असे सांगणाऱ्या नितेश राणेंनी आता कॅन्सर कसा होणार नाही याबद्दल सांगावे.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडमध्ये राज्य शासनाने दिलेल्या निधी च्याच कामांचे भूमिपूजन केले. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी आपल्या सोयिस्कर बदलत्या भूमिकेबद्दल बोलावे. सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्या नितेश राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असेही सावंत म्हणाले. यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, संतोष परब उपस्थित होते.
________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*