मतदारसंघातील बचतगटांच्या महिलांसाठी आ.भास्करराव जाधव यांचे पुढचे पाऊल
🟥मतदारसंघातील बचतगटांच्या महिलांसाठी आ.भास्करराव जाधव यांचे पुढचे पाऊल
🟥नामवंत डॉक्टरांना आणून मार्गदर्शन,तपासणी व उपचार करणार
▪️१९ रोजी मालदोली प्रभागसंघाच्या सभेतून सुरूवात..
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,१७: शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांची एक मोठी चळवळ उभी राहत आहे. गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी या चळवळीला भक्कम पाठिंबा दिला असून त्यांच्या सक्षमीकरण व आर्थिक उन्नतीसाठी ते वैयक्तिक व शासन पातळीवरून विविध प्रकारे मदत करीत आहेत. आता त्यापलिकडे जावून हजारोंच्या संख्येने एकत्र येणाऱ्या मतदारसंघातील महिलांना त्यांच्या विविध आजारांबाबत मार्गदर्शन, तपासणी व अल्पदरात उपचार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. येत्या गुरूवारी (दि१९)मालदोली प्रभागसंघाच्या होत असलेल्या वार्षिक सभेमधून त्याची सुरूवात होत आहे.
आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे मिरज, कराडमधील अनेक नामवंत डॉक्टरांशी अत्यंत स्नेहाचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. काल (रविवारी) हे डॉक्टर्स त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले होते. त्यावेळी आ. श्री. जाधव यांनी त्यांच्यासमोर बचतगटांतील महिलांच्या चळवळीविषयी सांगितले आणि या महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीची, त्यांच्या आजारांवर उपचारांची आवष्यकता असून त्यासाठी आपण सहकार्य कराल का, अशी विचारणा केली. त्यावर सर्वच डॉक्टरांनी आपण बोलवाल त्यावेळी येवू, असा शब्द दिला. त्याचवेळी मालदोली प्रभागसंघाच्या सभेपासून सुरूवात करण्याचे ठरले. त्यानुसार शासनाचा आनंदीबाई जोशी पुरस्कारप्राप्त मिरजच्या सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे चेअरमन, प्रसिध्द स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. रविंद्र आरळी हे मार्गदर्शन करण्यासाठी उपथित राहणार आहेत.
गेल्या महिनाभरापासून महिला प्रभागसंघांच्या वार्षिक सभा ठिकठिकाणी सुरू आहेत. या सभांना उपस्थित रहावे यासाठी प्रभागसंघांच्या महिला स्वतःहून निमंत्रण घेवून आमदार श्री. जाधव यांच्याकडे आल्या आणि त्यांनीही त्यांचे निमंत्रण स्विकारले. पहिल्यांदा खेर्डी प्रभागसंघाच्या सभेला त्यांनी उपस्थिती लावली. या सभेला हजारोंच्या संख्येने असलेली उपस्थिती पाहिल्यावर महिलांची चळवळ उभी राहत असल्याचे, उमेद अभियानाच्या माध्यमातून त्यांचा त्यांच्या संसाराला हातभार लागतो आहे, दिवाळीच्या सणाप्रमाणे चांगले कपडे, दागिने, फेटे घालून महिला या सभांमध्ये सहभागी होता. त्यातून निष्चितपणे बचतगटांच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती होवू शकते, हे त्यांच्या लक्षात आले. कोरोनाच्या काळातही या महिलांनी शासनाचा एकही रूपया थकवला नाही. अशा प्रभागसंघांसाठी त्यांनी वैयक्तिक मदत दिलीच, पण त्याशिवाय शासनाने त्यांना अधिकच आर्थिक सहाय्य करावे, त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ज्या ठिकाणी सरकारी इमारती होतील तिथे तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानक अशा ठिकाणी जागा शासनाने निष्चित करून दयावी, विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
पण, एवढयावरच न थांबता आमदार श्री. जाधव यांनी एक पाऊल पुढे जायचे ठरवले, ते म्हणजे गुहागर मतदारसंघातील प्रत्येक प्रभागसंघांच्या सभेमध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित नामवंत डॉक्टर्स आणून त्यांच्यामार्फत त्यांना मार्गदर्शन, तपासणी आणि अल्पदरात उपचार करणे. त्याची सुरूवात दि. १९ रोजी मालदोली प्रभागसंघाच्या रिगल हॉल, कोंढे येथे होणाऱ्या अग्निपंख महिला प्रभागसंघाच्या सभेमधून होणार आहे.
———————————————
*भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कुडाळ*
*येथे “ग्रामीण करियर एजंट” नेमणे आहेत..!!!*
=======================
*वेतन मासिक ₹5000 + कमिशन + बोनस*
*शिवाय ग्रॅच्युटी, मेडिकल कव्हर, ग्रुप इन्शुरन्स अधिक भत्ते लागू*
=======================
*पात्रता-*
*कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी*
*शैक्षणिक अर्हता-*
*12 वी पास / पदवीधर*
=======================
*वयोमर्यादा-*
*खुला- 18 ते 35 वर्ष.*
*मागासवर्गीय-18 ते 40 वर्ष.*
=======================
*अर्ज करण्याची शेवटची तारीख*
*15/05/2022*
*लेखी परीक्षा व मुलाखत -*
*22/05/2022*
*ठिकाण -*
*कुडाळ LIC कार्यालय*
=======================
*वरील पात्रता धारक गरजू उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.. (जागा मर्यादित.)*
=======================
*उमेश गावडे*
*विकास अधिकारी,*
*भारतीय आयुर्विमा महामंडळ*
*मो. नंबर- 9421082622*
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️ *आपले Application आमच्याकडे आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

