ग्रामसेवक मंगेश पांचाळ यांची राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक सेवारत्न पुरस्कारासाठी निवड..
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण :* तालुक्यातील पाचाड व कोंढे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री मंगेश पांचाळ यांची मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने दिले जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक सेवारत्न पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.दिनांक २५/०२/२०२१ रोजी मुंबई (परळ) येथे सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.राजापुर् तालुक्यातील बागवेवाडी जि.रत्नागिरी येथील रहिवाशी असून ते सन ०२/०४/१९९४ रोजी खेड पंचायत समिती येथे रुजू झाले.खेड तालुक्यातील देवघर व घेरा रसाळगड या दोन ग्रामपंचायती मध्यें सुमारे १८ वर्षे प्रामाणिकपने काम केले.तेथील ग्रामस्थानां चांगल्या प्रकारे सेवा दिली.त्यानंतर सन २०१२ रोजी ते प्रशासकीय बदलीने चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायतीत हजर झाले तेथे देखील ७ वर्षे ऊत्कृष्ट पद्धतीने कामकाज केले सदर ठिकाणी कामकाज करत असताना तालुक्यातील कापरे,खेर्डी,कापसाळ,धामणवणे व टेरव या ग्राम पंचायती मध्ये कामकाज केले.सन २०१९ मध्ये ते प्रशासकीय बदलीने पाचाड व कोंढे ग्रामपंचायतीमध्यें कार्यरत आहेत.लोकप्रिय ग्रामसेवक म्हणून ते तालुक्यामध्यें परिचित आहेत.त्यांनां क्रिकेट व गायनाची आवड असून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महागायक स्पर्धेत सहभागी होत असतात.कोरोना महामारीमध्यें त्यांनी सादर केलेला ‘बांधवांनो घराबाहेर पडू नका’ संदेशाचा व्हिडीओ जिल्ह्यामध्ये व्हायरल झालेला होता.असा गुणी कलावंत गरीबांचा कैवारी, प्रेमळ स्वभाव अशा व्यक्तीस हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक युनियन चिपळूण तालुका ग्रामसेवक युनियन व पंचायत समिती चिपळूण यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_